लॉकडाऊनच्या काळात काही नवीन वेबसिरीज येत आहेत. त्यामध्ये मनोज वाजपेयीची “द फॅमिली मॅन-2′ ही वेबसिरीज 21 मे पासून सुरू होत आहे. मात्र त्याअगोदर 14 मे पासून “द लास्ट अवर’ ही वेबसिरीज सुरू होते आहे. यामध्ये संजय कपूर, शहाना गोस्वामी आणि रायमा सेन मुख्य भूमिकेमध्ये असतील. ही एक सुपरनॅचरल क्राईम सिरीज असणार आहे. डोंगराळ प्रदेशातील एका छोट्याशा गावात घडलेल्या घटनांवर या वेबसिरीसची कथा आधारलेली आहे.
एका खतरनाक गुन्हेगाराला पकडण्यासाठी झपाटलेला एक पोलीस इन्स्पेक्टर यामध्ये दिसणार आहे. “द लास्ट अवर’चा टीजर बुधवारी सोशल मीडियावर शेअर केला गेला. संजय कपूर 2018 मध्ये नेटफलिक्सवरील “अंथोलॉजी फिल्मच्या “लस्ट स्टोरीज’ मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर उतरला आहे.
त्यानंतर त्याने “फेमजेम’वेबसिरीजमध्येही काम केले होते. आता “द लास्ट अवर’ मध्ये संजय लीड रोलमध्ये दिसणार आहे. सिनेमातून त्याने जवळपास निवृत्ती घेतल्यासारखीच स्थिती आहे. “द लास्ट अवर’या वेबसिरीजमध्ये क्राईम थ्रिलरबरोबर सस्पेन्सचाही तडका असणार आहे.