पुणेकरांचे ‘उड्डाण’; अनलॉक सुरू होताच प्रवास वाढले

पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा देखील स्थगित ठेवली होती. अनलॉकमध्ये शेकडो प्रवाशांची ये-जा सुरू आहे. मागील तीन महिन्यांत विमान आणि प्रवाशांच्या संख्येत देखील वाढ झाली असून, दर महिन्याला लाखो नागरिक प्रवास करत आहेत. ऑगस्टमध्ये 1 हजार 684 विमानांद्वारे तब्बल 1 लाख 49 हजार 588 नागरिकांनी प्रवास केला आहे.

 

करोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. लॉकडाऊननंतर साधारण 25 मेपासून देशाच्या काही भागांत प्रवासी विमानसेवा सुरू झाली. पहिल्या टप्प्यात केवळ ठराविक शहरांतर्गत प्रवास करण्याची परवानगी होती. पुणे विमानतळाहून देखील दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, कोची, बंगळुरू आदी शहरांत विमानांची ये-जा सुरू होती.

 

अनलॉकनंतर नोकरी, व्यवसाय सुरू झाल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. मास्क, फेसशिल्डसह नागरिकांना विमान प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत विविध राज्यांनी नियमावली देखील जाहीर केली आहे. एप्रिलमध्ये 6 विमानांची ये-जा झाली होती. ही संख्या ऑगस्टमध्ये 1 हजार 684 विमानांची ये-जा झाली आहे. यातून एप्रिलमध्ये 130, तर ऑगस्ट 1 लाख 49 हजार 588 जणांनी प्रवास केला.

महिना – प्रवासी

  • एप्रिल – 130
  • मे – 17,295
  • जून – 1,17,550
  • जुलै – 1,09,978
  • ऑगस्ट – 1,49,588

महिना – विमान फेऱ्या

  • एप्रिल – 6
  • मे – 204
  • जून – 1,391
  • जुलै – 1,440
  • ऑगस्ट – 1,684

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.