शेतकरी आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद ; रोममध्ये भारतीय दूतावासाच्या भिंतींवर लिहिले ‘खलिस्तान जिंदाबाद

अमेरिकेतही खलिस्तानाचे झेंडे फडकावले

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला दिल्लीमध्ये हिंसक वळण लागले. या हिंसाचारात अनेक शेतकरी तसेच पोलीससुद्धा जखमी झाले. या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियारवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. याच सगळ्यात खलिस्तानी स्वत: साठी जमीन शोधताना दिसून आले.

अमेरिका, वॉशिंग्टन डीसीमध्ये कृषी कायद्याला विरोध करताना खलिस्तान समर्थकांनी भारतीय दूतावासाच्या बाहेर तर निदर्शने तर केलीच पण त्यांनी खलिस्थानी झेंडेही यावेळी फडकवले.

कृषी कायद्यावरून देशात मोठ्या हिंसाचार उफाळला आहे. या मोर्चाच्या वेळी दिल्लीत वातावरण तापले होते. बॅरिकेट्स तोडण्यात आले. पोलिसांविरोधात तलवारी दाखवण्यात आल्या. इतकंच नाही तर लाल किल्ल्यावरही दरोडेखोरांनी धार्मिक ध्वजारोहण केले. याचे परिणाम विदेशातही दिसून आले. अमेरिकेतील निदर्शनादरम्यान लोकांनी त्यांत्या हातात खलिस्तानाचा ध्वज फडकवला होता.

शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली खलिस्तानी समर्थकांनीही इटलीतील रोममध्ये भारतीय दूतावासात निदर्शने केली. एशियानेट व्हीडिओनुसार, खलिस्तानी समर्थकांनी दूतावासाच्या भिंतींवरही घोषणा लिहिल्या. ‘खलिस्तान जिंदाबाद’ असं लिहून त्यांनी दूतावासात खलिस्तान झेंडा फडकावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.