नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धर्मध्वज फडकावला. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.
लाल किल्ल्यावर धर्मध्वज फडकवणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला आहे. जुगराज सिंह असे त्या व्यक्तीचे नाव असून पंजाबच्या तरण तारण जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हा दावा त्याच्या नातेवाईकांनीच केला आहे. आपल्या नातेवाईकाने धर्मध्वज फडकवल्याचा दावा करणारा व्हिडीओ त्यांनी अभिमानाने पोस्ट केला आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला ध्वज हा खलिस्तानचा असल्याचा दावा काहींनी केला. सोशल मीडियावर ज्या गोष्टी पसरवरल्या जात आहेत, त्या चुकीच्या असून आंदोलकांनी खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकवलेला नाही. तर शिख धर्मातील खालसा पंथाचा तो झेंडा होता.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा