वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरु असलेला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान दिलेल्या प्रतिसादात म्हटले आहे. ट्रम्प यांच्या विरोधात सिनेटमध्ये सुरु झालेल्या महाभियोगाच्या खटल्याविरोधात त्यांच्या वकीलांनी पहिल्यांदाच, एका विस्तृत निवेदनाच्या स्वरुपात प्रतिसाद सादर केला.
महाभियोगासाठी दाखल करण्यात आलेली दोन अर्टिकल फेटाळण्यात यावीत, अशी मागणीही या विस्तृत निवेदनामध्ये करण्यात आला आहे. हे दोन्ही लेख काउन्टीमधील लोकांच्या इच्छेला नाकारण्याचा एक निर्लज्ज आणि बेकायदेशीर प्रयत्न आहेत, असेही व्हाईट हाऊसच्या कायदेशीर पथकाने म्हटले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत ट्रम्प यांच्या विरोधातला कोणताही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही, हा खटला म्हणजे 2020 साली अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणूकीत हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोग आणण्याचा अत्यंत पक्षपाती आणि बेपर्वाईचा प्रयत्न त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाला आणि आजही चालू आहे, असा आरोपही या निवेदनातून केला आहे.
शुक्रवारी ट्रम्प यांनी आपला बचाव करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील अनेक ख्यातनाम वकील नेमले असून महाभियोगाच्या सुनावणीला मंगळवारी दुपारी सुरुवात होणार आहे.