चाचणी घेतलेले हायपरसोनिक क्षेपणास्त्र नव्हते; चीनचे स्पष्टीकरण

बीजिंग – चीनने ऑगस्ट महिन्यात अण्वस्त्र सज्ज हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याची बातमी काल ब्रिटीश वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. मात्र ही चाचणी हायपरसोनिक क्षेपणास्त्राची नव्हती. तर हायपरसोनिक व्हेईकलची होती, असे स्पष्टिकरण चीनने दिले आहे.

ब्रिटीश वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तामध्ये या क्षेपणास्त्राने लक्ष्याच्या दिशेने माग काढण्यापूर्वी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली. ही प्रदक्षिणा अवकाशात कमी उंचीवरून केली होती, असे म्हटले आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी अमेरिकेच्या गुप्तचरांनाही समजू शकली नव्हती. ब्रिटीश वर्तमानपत्राने केलेल्या गौप्यस्फोटामुळे ही बाब अमेरिकेच्या गुप्तचरांना समजली.

त्यांच्यासाठी ही बाब आश्‍चर्य वाटावी अशी होती. या क्षेपणास्त्राला लक्ष्याचा वेध घेता आला नाही. हे क्षेपणास्त्र दोन डझन मैल दूरवर पडले असे म्हटले आहे.

मात्र हे क्षेपणास्त्र नव्हते. तर रॉकेट ग्लाईड व्हेईकल होते. असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी म्हटले आहे. ही एक नियमित अवकाश चाचणी होती. या व्हेईकलच्या नियमित वापरासाठी तंत्रज्ञानाची चाचणी होती. खर्चात कपात करण्यासाठी तसेच शांततापूर्ण कारणासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यासाठीच ही चाचणी घेतली गेली होती, असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.