मुंबई – इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेच्या एका सामन्यात अशी घटना घडली की त्यामुळे हा खेळ सभ्य गृहस्थांचा आहे का अशी शंका येत आहे. या सामन्यात इंग्लिश फलंदाज ऍलेक्स हेल्सला दुखापत झाली, पण प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू त्याला मदत करण्याऐवजी त्याच्याकडे पाहात हसत राहिले.
ओवल इनविंसिबल आणि ट्रेंट रॉकेट्स या दोन संघांदरम्यान सामना सुरु होता. फलंदाजी करणाऱ्या ट्रेंट रॉकेट्सचा फलंदाज ऍलेक्स हेल्स हा खेळपट्टीवर होता.
सलग दोन चेंडूंवर ऍलेक्सला दुखापतीचा सामना करावा लागला. चेंडू लागल्यावर ऍलेक्सला वेदना होत असतानाही एकही खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आला नाही.
समोरच्या संघातील खेळाडू हसत होते. त्यांच्यासह पंचही सहभागी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.