‘दंगल’ गर्ल झायरा पुन्हा झाली ट्रोल

मुंबई – आरएसवीपीच्या ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमावर नेटिझन्सने हल्ला केला आहे, या आगामी हिंदी सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालंय. चित्रपटाचं ट्रेलर काही वेळापूर्वी ‘आरएसवीपी’ने शेअर केलं, मात्र सर्वांचं लक्ष हे झायरा वसिमकडे गेलं, त्याचं कारण असं की काही महिन्यांपूर्वी दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार फेम झायरा वसीम हिने चित्रपटसृष्टीतून एक्झिट घेण्याचं ठरवलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आणि 5 वर्षाच्या बॉलिवूड करिअरनंतर तिने बॉलिवूडला अलविदा केला, झायराच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. झायराने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपला निर्णय चाहत्यांपर्यंत पोहोचवला. “अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून भटकले होते”, असा उल्लेख झायराने आपल्या पोस्टमध्ये केला होता. या काश्मिरी अभिनेत्रीने आपल्या धार्मिक श्रद्धेमुळे चित्रपटसृष्टी सोडण्याचीघोषणा केली.

तत्पूर्वी, “दंगल’ गर्ल झायरा वसिमने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. “द स्काय इज पिंक’चा वर्ल्ड प्रिमियर टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला होणार होता. यातील लीड ऍक्‍ट्रेस प्रियंका चोप्राने या फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहताना या सिनेमातील कलाकारांबरोबरचा फोटोही सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यामध्ये झायरा वसिमला बघितल्यावर नेटिझन्सनी झायराला ट्रोल करायला सुरुवात केली होती.

द स्काय इज पिंक’ सिनेमा 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर, रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर, शोनाली बोस यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाची कास्टही तगडी आहे, देसी गर्ल प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.