पुणे – आगामी दोन महिन्यांत पुण्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी उष्णतेचा कहर कायम राहणार असून, तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहण्याची शक्यता आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि हवामानशास्त्र विभागातर्फे ठराविक कालावधीदरम्यान हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्याबाबत म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांतील तापमानाचा अंदाज नुकताच वर्तवण्यात आला आहे.
यानुसार, “या काळात पश्चिम किनाऱ्यावरील गुजरात, सौराष्ट्र, कोकण-गोवा या विभागांत तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे.
तर दक्षिण भारतासह लगतच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या मध्य भारतातील विभागात दिवसा कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, या भागात उन्हाचा चटका अधिक जाणवेल.’