गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly elections 2022) वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. मुख्य लढत यंदा भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्ष यांच्यातच होणार असल्याचा कल घेतलेल्या जनमत चाचण्यांमध्ये दिसून आला आहे. सामान्यत: या राज्यात भाजप विरूध्द कॉंग्रेस अशीच लढत असायची. मात्र आता तरी कॉंग्रेसऐवजी मतदार आपला प्राधान्य देण्याच्या मनस्थितीत असल्याचे हा कौल सांगतो.
एबीपी न्यूज आणि सी व्होटर यांनी ही जनमत चाचणी घेतली आहे. त्यात भाजपची खरी लढत कोणाशी असणार आहे असे विचारल्यावर 46 टक्के नागरिकांना आम आदमी पक्षाशी ती असल्याचे वाटते. तर 40 टक्के जणांनी भाजप विरूध्द कॉंग्रेस असाच सामना होणार असल्याचे म्हटले आहे.14 टक्के लोकांनी अद्याप आम्ही काही विचार केला नसल्याची भूमिका मांडली आहे.
आपमुळे कॉंग्रेसचे नुकसान?
आम आदमी पक्षामुळे कॉंग्रेसचे खूप मोठे नुकसान होणार असल्याचे 44 टक्के जणांना वाटते. तर 33 टक्के लोकांना थोडेसेच नुकसान होईल असे वाटते. 23 टक्के लोकांनी तर कॉंग्रेसचे काही नुकसान होणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, कॉंग्रेसबाबत महत्वाची आणि सकारात्मक बातमी अशी की नागरिकांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणजे मौन राहुनही कॉंग्रेस आप पेक्षा मजबुत पक्ष असल्याचे मत 54 टक्के लोकांनी व्यक्त केले. तर 46 टक्के लोकांनी नकारार्थी मत नोंदवले.
Jayalalithaa Death Case : जयललिता यांच्या मृत्यूबाबतचे गूढ वाढले; चौकशी आयोगाने शशिकला यांच्या…
आप आणि कॉंग्रेस यांच्यात मतांची विभागणी होणार असल्याचे बहुतांश लोकांनी मान्य केले. ही मतविभागणी होईल असे 52 टक्के जणांना वाटते आहे.