पणजी – फिफा महिलांच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या लढतीत कोलंबियाने मेक्सिकोचा 2-1 असा पराभव केला (Colombia beat Mexico) व आगेकूच केली.
कोलंबियाच्या या विजयात जुआना गिराल्डोने 41, तर लिंडा सैसेडोने 74 व्या मिनिटाला गोल करत वर्चस्व राखले. कोलंबियाने या स्पर्धेतील क गटात 6 गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. त्यांनी तीन सामन्यांत दोन विजय, तर एक पराभव अशी कामगिरी केली आहे.
अन्य लढतीत स्पेनने चीनवर 1-0 अशी मात केली. स्पेनकडून मरीना मुरेनोने 61 व्या मिनिटाला गोल केला. चीनच्या होनपिंग झांगने गैरवर्तन केल्याने पंचांनी तिला रेड कार्ड दिले, त्यामुळे आधीच पिछाडीवर असलेल्या चीनला त्याचा फटका बसला व हा सामना गमवावाही लागला.