पुणे – दिवसभरात नव्या 98 करोना बाधितांची नोंद झाली तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोन पुणे शहरातील असून, एक पुणे हद्दीबाहेरील आहे.
करोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये कमी झाली होती. मात्र बुधवारी ती वाढल्याचे दिसून आले. याशिवाय संशयितांच्या टेस्टही पुन्हा पाच हजारांच्या जवळपास गेल्या आहेत.
बाधितांची संख्या शंभराच्या जवळ म्हणजे 98 नोंदवण्यात आली. तर 69 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 5 लाख 4 हजार 495 बाधित आढळले असून, त्यातील 4 लाख 94 हजार 732 जण बरे झाले आहेत. तर 9 हजार 76 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय बाधितांची संख्या मात्र कमी झाली असून, ती 687 आहे. त्यातील 94 जणांची प्रकृती गंभीर असून, 85 जण ऑक्सिजनवर आहेत.