नवी दिल्ली -अमेरिका आणि चीनदरम्यानचे व्यापारयुद्ध वाढल्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी स्थानिक पातळीवर सोन्याचे दर स्थिर राहिले. मात्र चांदीच्या दरात 380 रुपयांची वाढ झाली आहे.
अखिल भारतीय सराफ संघटनेने जाहीर केलेल्या माहितीनुसार दिल्ली शुक्रवारी शुद्ध सोन्याचे दर केवळ दहा रुपयांनी वाढून 32,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर स्टॅंडर्ड सोन्याचे दरही दहा रुपयांनी वाढून 32,730 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
मात्र औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला चांगली मागणी असल्यामुळे चांदीचे दर शुक्रवारी 380 रुपयांनी वाढून 38,600 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात वाढले होते. जर अमेरिका-चीनदरम्यानचे व्यापारयुद्ध चिघळले तर जागतिक बाजारात धातूंचे भाव वाढण्याची शक्यता आहे.