बॉलिवुड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांचा “तानाजी- द अनसंग वॉरिअर’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं सेलिब्रिटींसाठी खास स्क्रीनिंग काल (गुरुवारी) ठेवण्यात आले होते. यावेळी अजयचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. याप्रसंगी काजोल युगला घेऊन स्क्रीनिंगला आली होती, तर न्यासा काही वेळानंतर एकटीच आली. यावेळी न्यासाचा ग्लॅमरस लुक सर्वासाठी आकर्षण ठरले.
न्यासाने पोल्का डॉट शॉर्ट ड्रेस घातला होता. यावेळी न्यासाने तिचे केस मोकळे सोडले होते. मोकळ्या केसांमुळे तिचे सौंदर्य अजून खुलून येत होते. सध्या सोशल मीडियावर न्यासाचे स्क्रीनिंगवेळचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. चित्रपटाचे स्क्रीनिंग पाहण्यासाठी न्यासाच्या चेहऱ्यावर खूपच उत्सुकता दिसत होती.
दरम्यान, सुमारे 11 वर्षांनंतर अजय आणि काजोल एकत्रित काम करताना दिसणार आहेत. अजयचा हा 100 वा सिनेमा आहे. तानाजी मालुसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू आणि शूर असा कर्तव्यनिष्ठ सेवक. स्वराज्यासाठीच्या अनेक कामगिऱ्या तानाजींनी फत्ते केल्या.
आपल्या देदीप्यमान शौर्याने तानाजी मालुसरे हे नाव अजरामर योद्धा म्हणूनच कायम ओळखले गेले. याच योध्याची शौर्यगाथा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात साकारली जात असून तानाजीच्या भूमिकेचे शिवधनुष्य अजय देवगणने उचलले आहे.