औरंगाबाद – प्रवासादरम्यान रिक्षा चालकाने छेड काढल्यामुळे मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उडी मारल्यामुळे मुलीच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे समजते. औरंगाबाद शहरात घडलेला हा प्रकार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला.
अल्पवयीन मुलगी आपल्या क्लासवरून रिक्षाने घरी जाताना रिक्षा चालकाने तिच्यासोबत अश्लील भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या तरुणीने कोणताही विचार न करता चालू रिक्षामधून थेट रस्त्यावर उडी मारली. यावेळी रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ होती. मुलीने रस्त्यावर उडी मारताच पाठीमागून आलेल्या गाडीने प्रसंगावधात दाखवत ब्रेक दाबला आणि मोठा अनर्थ टळला. औरंगाबाद शहरातील शिल्लेखाना चौक ते शिवायी हायस्कूल दरम्यान हा अपघात घडला.
25 व्या सेकंदाला पाहा काय घडलं..! मुलींनी रिक्षातून प्रवास करताना अधिक काळजी घ्यावी, घटना औरंगाबादची #CCTV #Aurangabad #Girl #AutoRikshaw pic.twitter.com/ynDwE5SsBo
— Siddhesh Sawant (@ssidsawant) November 16, 2022
यावेळी बघ्यांची मोठी गर्दी रस्त्यावर जमल्याचे दिसून आले. हा संपूर्ण थरार रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. यावरून पोलिसांनी तपास करत रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. गर्दी असलेल्या भर रस्त्यावर हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.