पुणे – शहरात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला होता. पण, आता पुन्हा एकदा शहरात थंडी वाढणार असून किमान तापमान 10 अंश सेल्सिअसखाली नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे यावर्षी राज्यातील थंडीचा मुक्काम वाढणार असल्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील काही राज्यांत हिमवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यांतील तापमानात घट होणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पुढील पाच ते सहा दिवस थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शहरात मागील काही दिवसांपूर्वी किमान 15 आणि कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे काही प्रमाणात हवेतील गारवा कमी झाला होता. पण आता पुन्हा एकदा शहरातील थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शहरातील विविध भागातील तापमान अंश सेल्सिअस मध्ये
शिवाजीनगर – 11.5
पाषाण – 13
लोहगाव – 14.8
चिंचवड – 17.9