कोल्हापूर परिक्षेत्रातील मोक्काच्या गुन्ह्यातील पहिलीच शिक्षा पुण्यात

तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंड : तरूण-तरूणीला बापदेव घाटात लुटले होते

पुणे – बोपदेव घाटात भर दुपारी तरूण-तरूणीला लुटणाऱ्या तिघांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार पाच वर्षे सकक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए.एन.सिरसीकर यांनी हा आदेश दिला. कोल्हापुर परिक्षेत्रात मोक्‍क्‍याची झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. दंड न भरल्यास तिघांना अतिरिक्त तीन वर्षे अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

विशाल निवृत्ती लिंभोरे, प्रवीण रामंचद्र लिंभोरे आणि नीलेश शिवाजी लिंबोरे (रा. भिवरी, ता. पुरंदर) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत सागर शामराव डोळस (रा. हडपसर) याने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 28 जून 2014 रोजी दुपारी 1 च्या सुमारास घडली.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे मोक्काचे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपीकडून चोरीचा मुद्देलाम ज्या पंचासमोर जप्त केला. त्या पंचची आणि डॉक्‍टरांची साक्ष, ओळखपरेडमध्ये तिन्ही आरोपींना फिर्यादी आणि मैत्रिणीने ओळखणे महत्त्वाचे ठरले. मोक्का लावण्यासाठी पूर्व परवानगी देणारे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांची साक्ष नोंदविण्यात आली.

सासवड विभागातील उपपोलीस अधीक्षक अशोक भरते यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना सहायक पोलीस निरीक्षक आर.बी.वाकडे, सहायक पोलीस फौजदार एस.एल.वाघमारे आणि पोलीस हवालदार एस.एच.मोरे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)