पॅरिस : काही व्यक्ती विविध प्रकारचे विक्रम केवळ त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घ्यावी म्हणून करत असतात. पण अनेक वेळा या विक्रमाची दखलही घेतली जात नाही. अशाच प्रकारचा अनुभव फ्रान्समधील एका व्यक्तीला आला आहे. त्याने तब्बल सात लाख पेक्षा जास्त काडेपेटीच्या काड्यांचा वापर करून आयफेल टॉवरची उभारणी केली. पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मात्र हा विक्रम मानायला नकार दिला.
रिचर्ड फ्लॉड असे या व्यक्तीचे नाव असून तो 42 वर्षांचा आहे. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल 4200 तास खर्च करून त्याने या आयफेल टॉवरची उभारणी केली होती. या टॉवरच्या प्रतिकृतीची उंची साधारण 7 मीटर म्हणजे 23 फुटापेक्षा जास्त होती. पूर्वी लेबानन मधल्या एका कलाकाराने 60 लाख काड्यांचा वापर करून 21 फूट उंच टॉवरची प्रतिकृती उभारली होती. त्यापेक्षा कमीत कमी काड्यांचा वापर करून सर्वात उंच प्रतिकृती उभारण्याचा विक्रम आपल्या नावावर होईल, असे रिचर्डला वाटत होते. त्यासाठी त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडे अर्जही केला पण गिनीज अधिकाऱ्यांनी त्याच्या या प्रतिकृतीची पाहणीही न करता त्याचा अर्ज फेटाळून लावला.
अशा प्रकारचा विक्रम करताना दैनंदिन उपयोगात असलेल्या आग काड्यांचा वापर करणे गरजेचे असते. या काड्यांची लाल टोके कट करून उर्वरित काड्यांच्या माध्यमातून प्रतिकृती उभारायला हवी, असे कारण गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी रिचर्डला दिले आहे. पॉलने हा विक्रम करत असताना ज्या काड्या उपलब्ध केल्या होत्या त्या आगपेटीच्या काड्या होत्या . पण एका आगपेटी निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून त्याने लाल टोक असलेल्या काड्या वगळून सर्वसाधारण काड्या मागवल्या होत्या आणि त्याच्याच आधारे आयफेल टॉवर उभारले होते म्हणूनच त्याच्या विक्रमाची दखल घेण्यात आली नाही.