दुबई : जगभरातील पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या दुबईमध्ये नेहमीच विविध प्रकारची आकर्षणे विकसित केली जातात. दुबईमधील नॉलेज पार्क पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहेच. आता याच नॉलेज पार्कमध्ये जगातील सर्वात मोठ्या रुबिक क्यूबची निर्मिती करण्यात आली आहे. दुबई नॉलेज पार्कच्या विसाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून हा क्युबिक तयार करण्यात आला आहे.
रुबिक क्यूब म्हणजे एक चौकोनी कोडे असते. ज्याचे विविध रंग शेजारी शेजारी आणून हे कोडे सोडवायचे असते. नॉलेज पार्कच्या दारात उभारण्यात आलेला हा मोठा रुबिक क्यूब सर्व बाजूंनी 9.8 फूट आहे. या क्युबचे वजन 680 पाउंड म्हणजे जवळजवळ साडेतीनशे किलो आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या क्यूबची पाहणी केली आणि हा जगातील सर्वात मोठा क्युबिक असल्याची माहिती त्यांनी प्रसारित केली. त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या क्युबिकची नोंद झाली आहे.
दुबई नॉलेज पार्क हा अतिशय मोठा परिसर असून तेथे 700 पेक्षा जास्त शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक केंद्रे विकसित झाली आहेत या पार्क च्या प्रवेशाच्या बाहेरच हा क्युबिक उभारण्यात आला असून कोणीही या क्युबिकचे कोडे सोडवू शकतो, असे आवाहन करण्यात आले आहे.