मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करुन चर्चेत असते. यातच तिने अभिनेत्री दीपिका पादुकोणला टोला लगावलामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
‘छपाक’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असताना अभिनेत्री दीपिका पादुकोण अचानक दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात दाखल झाली होती. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर जालेल्या भ्याड हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. याचवेळी दीपिकाने आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. याच प्रकरणावरुन कंगनाने दीपिकावर टीका केली आहे.
कंगना म्हणाली की, मला वाटतं की ती (दीपिका) तिच्या सांवैधानिक अधिकाराचा वापर करत आहे. ती ते करु शकते. तिला माहीत आहे की, ती काय करतेय. तसेच ती काय करतेय यावर मी माझं मत मांडणं चुकीचं ठरेल. तिने काय करायला हवं, हे मी ठरवू शकत नाही. मी केवळ मला काय करायचं आहे ते ठरवू शकते.
कंगना दीपिकावर निशाणा साधत म्हणाली की, मी कधीही तुकडे-तुकडे गॅंगचं समर्थन करणार नाही. मला माहीत आहे की, काहीही झालं तरी या तुकडे तुकडे गॅंगचं समर्थन करणं योग्य ठरणार नाही. जो या देशाचे तुकडे करु इच्छितो अशा कोणत्याही व्यक्तिचं मी समर्थन करु शकत नाही.
मी त्या लोकांना पाठिंबा देऊ शकत नाही. जे लोक आपल्या देशाचे जवान शहीद झाल्यानंतर सेलिब्रेशन करतात अशा लोकांचा मी विरोध करते. असं म्हणत तिने दीपिकावर निशाणा साधला आहे.