जेएनयू भेटीवरून दीपिकाला दिला रामदेव बाबांनी ‘हा’ सल्ला

मुंबई – जेएनयू हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण जवाहलाला नेहरू विद्यापीठात दाखल झाली होती. मात्र दीपिकाच्या चाहत्यांनी सुद्धा तिच्या कालच्या भेटीचा विरोध केला आहे, याच पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेव बाबा यांनी दीपिका पदुकोणला सल्ला दिला आहे.

रामदेव बाबा म्हणाले,”सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे योग्य आकलन करून घेण्यासाठी दीपिका पदुकोणने माझ्यासारखा सल्लागार नियुक्त केला पाहिजे.

रामदेव बाबा पुढे म्हणाले,’दीपिकामध्ये अभिनयाचे गुण असणे ही वेगळी गोष्ट आहे. राजकीय आणि सांस्कृतिक मुद्द्यांचे मुद्द्यांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी देशाबद्दल जाणून द्यावे लागले आणि तिला वाचनही करावे लागेल. तिने हे समजून घेतल्यानंतर मोठे निर्णय घेतले पाहिजे. तसेच अशा प्रकारच्या वादाच्या प्रसंगात योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी तिने माझ्यासारखा सल्लागार ठेवला पाहिजे’, असेही रामदेव बाबा म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.