पाकिस्तानात हिमस्खलनात 90 जणांचा मृत्यू

लाहोर : हिमस्खलन आणि बर्फवृष्टीने पाकिस्तानात मंगळवारी 90 हून अधिक जण मरण पावले. जखमींची संख्या 29वर पोहोचली आहे, असे पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

बलुचिस्तानमध्ये पावसामुळे 15 जण मरण पावले तर 11 जण जखमी झाले. पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये किमान 55 जण मरण पावले तर 12 जण जखमी झाले. नीलम खोऱ्यात हिमस्खलनात 19 जण मरण पावले. तर 10 जण जखमी झाले. येथून चार जणांना बाहेर काढण्यात आले. अन्य काही जणांना बाहेर काढण्याचे काम अद्याप सुरू आहे.

बलुचीस्तानात बर्फवृष्टीने कहर केला आहे. खैबर पख्तुन्ख्वा परगण्यात 23 इंच जाडीचा बर्फ साचला आहे. गिलगिट आणि काश्‍मीरमध्ये तुरळक पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी झाली.
सोमवारी हिमस्खलन आणि भू स्खलानाच्या घटनांत किमान 21 जण मरण पावले असल्याची भीती सरकारी सूत्रांनी व्यक्त केली. तर रविवारीही सुमारे 25 जण मरण पावले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.