संक्रात… अन् काळ्या साड्या

पुणे : नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. येत्या १५ जानेवारीला मकरसंक्रांत असून हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिळगुळासोबतचं काळ्या साडीला अत्याधिक  यादिवशी महत्व आणि मान असतो.

सध्या पुण्यातील बाजारपेठा काळ्या रंगाच्या साड्यांनी फुललेल्या असून काळ्या साड्यांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध झालेले आहेत. व त्याला ग्राहकांचा देखील उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतो. विशेषतः तरुणींचा यात सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. फॅशन आणि संस्कृती यांचा योग्य तो ताळमेळ बसवून सण साजरे करण्याचा ट्रेंड सर्वत्र पाहायला मिळतो.

Leave A Reply

Your email address will not be published.