बेल्हे : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील एका ६५ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले आहे. या महिलेने बेल्हे येथील एका खाजगी दवाखान्यात तीन दिवस उपचार घेतले. यानंतर या महिला पुढील उपचारासाठी मंचर येथील कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते.
या महिलेचा मंचर येथील कोविडं सेंटर मध्ये शनिवार (दि. २५) रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या महिलेचा रविवार (दि.२६) रोजी रिपोर्ट आला असून ती महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालं आहे. या महिलेवर अंत्यसंस्कार करताना प्रशासनाने खबरदारी घेतली होती अशी माहिती तालुक्याचे आरोग्य अधिकारी उमेश गोडे व निमगाव सावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक संभाजी गोडे यांनी दिली. यामुळे निमगाव सावा तील एकूण रुग्ण संख्या ३ झाली आहे.