मुंबई – अमिरातीत येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व संघांतील खेळाडूंची रोज करोना चाचणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मालकांनी बीसीसीआयकडे ही मागणी केली आहे.
या स्पर्धेवरीव मळभ दूर झाल्याने आता ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू काही दिवस आधीच अमिरातीत दाखल होणार आहेत.
या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार असून अहवाल आल्यावरच त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच अमिरातीत दाखल झाल्यावरही चाचणी होणार आहे.