दबंग 3 चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज, दबंग 3 चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. टट्रेलर मध्ये सलमान खान आणि सई मांजरेकर यांची जोरदार केमेस्ट्री दिसून येत आहे. त्यामुळे दबंग 3 चित्रपट प्रेक्षकांसाठी उत्तम मेजवानी ठरणार आहे.

दरम्यान, चित्रपटात कन्नड अभिनेता सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंग 3 मध्ये सलमान खान आणि सुदीप यांचे जोरदार ऍक्‍शन सीन प्रेक्षकांना दिसणार आहेत. येत्या 20 डिसेंबरला दबंग 3 चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.