पिंपरी, (प्रतिनिधी) – एका विवाहितेने आपल्या सासऱ्याला रासायनिक घटक असलेले आणि इतर पावडर जेवणात दिली. त्यामुळे सासऱ्याची प्रकृती बिघडली. याप्रकरणी सासऱ्याच्या फिर्यादीवरून सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 6 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत बावधन येथे घडला. याप्रकरणी 60 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या सुनेने त्यांना मोलिव्हेनम हा रसायन घटक असलेली आणि इतर ब्राऊन रंगाची पावडर नाष्टा व जेवणात मिसळून खायला दिली.
त्यामुळे फिर्यादी यांची प्रकृती बिघडून त्यांची शारीरिक हानी झाली. अशा पावडर खाण्यामुळे शारीरिक हानी आणि इतर विकार होऊ शकतात याची कल्पना असताना देखील सुनेने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.