तरुणाईमध्ये सध्या स्मार्ट गॅजेट्सची प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळतंय. यामध्ये मनगटावरील घड्याळापासून ते वायरलेस हेडफोन्स या गॅजेट्सना यंगस्टर्समध्ये प्रचंड मागणी आहे. याखेरीज, नामांकित कंपन्यांचे स्मार्ट गॅजेट्स आता खिशाला परवडतील अशा किमतींमध्ये उपलब्ध असल्याने पॉकेटमनीमध्ये ती सहज खरेदी करता येतायेत.
स्मार्ट बॅंड : ऍनालॉग घड्याळाची जागा आता स्मार्ट बॅंडने घेतली आहे. यंगस्टर्स स्मार्ट बॅंडचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. ऍनालॉग घड्याळाप्रमाणे स्मार्ट बॅंडचा वापर केवळ वेळ पाहण्यासाठी नव्हे तर मोबाइल नोटिफिकेशन पाहण्यासाठी, हार्ट बिट मोजण्यासाठी, व्यायाम करताना करता येतो. याखेरीज ते दिसायलाही स्टाईलिश असल्याने ते अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
ब्लूटूथ स्पिकर्स : जेव्हा आपण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत हॉलिडेसाठी बाहेर जातो तेव्हा प्रवासात मनपसंद गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी ब्लूटूथ स्पिकर्स उपयोगी ठरतात. ब्लूटूथ स्पीकर्सला आपला स्मार्टफोन कनेक्ट करून आपण या स्पीकरचा वापर करू शकतो. हे स्पिकर्स वजनाला हलके व रिचार्जेबल बॅटरीवर काम करत असल्याने ते सहज कोठेही घेऊन जात येतात.
इअर-बड्स : हे स्मार्ट गॅजेट देखील यंगस्टर्सच्या आवडीचं बनलं आहे. या स्मार्ट गॅजेटमुळे कोणत्याही वायरच्या झंझटशिवाय आपण म्युझिक एन्जॉय करू शकतो. तसेच अनेक ब्रॅंड्सच्या इअर-बड्सचा स्टोरेज बॉक्सचं चार्जर म्हणून काम करत असल्याने बॅटरी बॅकअप देखील तगडा मिळतो व इअर बड्स गहाळ होण्याचा धोकाही टळतो.