हडपसर – प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे सर्वेत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेचा त्याग असतो. समाजामध्ये आज महिलांचे योगदान प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन नितीन गावडे यांनी केले. शिवसैनिक नितीन गावडे यांच्या विद्यमाने जागतिक महिलादिन काळेपडळ, हडपसर येथे साजरा करण्यात आला.
यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, शहर प्रमुख संजय मोरे, नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेवक विशाल धनावडे, उपशहर प्रमुख समीर तुपे, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, प्रशांत पोमन उपस्थित होते. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.