मांजरी – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विक्रम जगन्नाथ शेवाळे यांची विशेष जबाबदारीसह नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अगोदर बूथ कमिट्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याला अनुसरून विक्रम शेवाळे यांना बूथ कमिटी प्रमुख समन्वयाची जबाबदारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. विक्रम शेवाळे यांनी यापूर्वी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस तसेच पुणे शहर सरचिटणीस या पदावरही प्रभावीपणे काम केले आहे.