नगर (प्रतिनिधी)- नगर शहराला पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवाहीनीच्या दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे नियमित होणार पाणीउपसा बंद करण्यात आला असून, नगर शहराचा पाणी पुरवठा त्यामुळे विस्कळीत होईल, अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.
बुधवारी (दि. 28) सायंकाळी नगर शहर पाणी योजनेच्या मुळानगर पंपींग स्टेशन परिसरात वादळी वार्यासह पाऊस झाल्याने वीज वितरण कंपनीकडून होणार्या वीज पुरवठयात तांत्रिक बिघाड निर्माण झालेला आहे. त्यामुळे रात्री पावणेनऊ वाजेपासून वीज पुरवठा खंडित झालेला होता.
हा वीज पुरवठा आज (दि.29) सकाळी सात वाजेच्या सुमारास सुरू झाला. नंतर बंद पडलेला पाणी उपसा सुरू करण्यात आला. सकाळी 9.30 वाजता पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरु झालेला आहे. परिणामी आज गुरुवार (दि.29) पाणी वाटपाच्या शहराच्या काही भागास पाणी पुरवठा होवू शकलेला नाही. या भागास उशीराने व कमी प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
शहर पाणी योजनेची मुख्य जलवाहीनी दुरुस्ती कामासाठी महापालिकेने घेतलेला शटडाऊन, दुरुस्ती कामास लागलेला अवधी व त्यानंतर सलग दहा तास खंडीत झालेला वीज पुरवठा आदी कारणांमुळे शहाराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला असल्यराचे स्पष्टीकरण महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिले आहे.
सध्या मान्सून पुर्व परिस्थितीत वादळी वार्यासह पाऊस होत असल्याने त्याचा शहर पाणी योजनेच्या वरज पुरवठ्यावर पर्यायाने दैनंदिन पाणी उपशावर परिणाम होत आहे. ही सर्व परिस्थीती विचारात घेवून नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकसरिने करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.