कराड -सातारा जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. कराड तालुक्याने बाधितांच्या क्रमवारीत आघाडी घेत तालुक्याचा आकडा दोन हजारापार गेला आहे. रविवारी कराड तालुक्यात 61 तर शहरात 22 जण करोनाबाधित वाढले आहेत.
शहरातील बाधितांचा आकडा 583 एवढा झाला आहे. यापैकी सध्या 344 जण बाधित असून 214 करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. हाय रिस्कमध्ये 1130 जण असून लो रिस्कमध्ये 659 जण आहेत. तर सौम्य लक्षणे असलेले सुमारे 180 जण घरीच उपचार घेत आहेत.
सातारा जिल्ह्यात सर्वत्र करोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. यात कराड तालुका पहिल्यापासून आघाडीवर राहिला आहे. सुरूवातीला करोनामुक्त असणाऱ्या कराड शहरात सध्या करोना रूग्णांचा आकडा सुमारे 600 पर्यंत गेला आहे.
येथील कृष्णा हॉस्पिटल, एरम हॉस्पिटल, सहयाद्री हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर पार्ले कोविड सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असणारे रूग्ण आहेत. कराड शहरातील हॉस्पिटलमधील बेड कमी पडत आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या सुमारे 180 रूग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
शहरातील या सर्व ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांवर घरीच उपचार व रिस्क असणाऱ्या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहेत. घरी उपचारा घेणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
रूग्णांना औषधे देणे, ऑक्सिजन व पल्स तपासणे यासह सूचना करणे आदी बाबींद्वारे रूग्णांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या रूग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रूग्णांना घरीच उपचार देण्यात येत आहे. या प्रक्रियेवर मुख्याधिकारी डाके लक्ष ठेवून आहेत.
गावानिहाय रविवारची बाधित रूग्ण संख्या
कराड तालुक्यातील हरपळवाडी 1, ओंड 2, कराड 22, हजारमाची 4, मसूर 1, सावदे 2, वाठार 2, जुलेवाडी 1, मंगळवार पेठ 5, खोडशी 1, राजाचे कुर्ले 1, कोयना वसाहत 1, कोडोल 1, शनिवार पेठ 6, रविवार पेठ 1, वडगाव हवेली 1, आनंदकाले 1, गुरुवार पेठ 1, वाघेरी 1, बेलमाची 1, होटेवाडी 1, उंडाळे 1, शुक्रवार पेठ 1, बनवडी 5, पाल 1, किवळ 2, बेलवडे बु 3, कोपर्डे हवेली 1, उपजिल्हा रुग्णालय 1, गोवारे 1, आगाशिवनगर 5, मलकापूर 3, रेठरे बुद्रुक 1 असे एकूण 83 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत.
मोठ्या प्रमाणावर औषधांची गरज
शहरातील वाढत्या रूग्णसंख्येला पुरेसा औषध साठा आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्राकडून प्रशासनाकडे औषधांची मागणी करण्यात आले आली असल्याची माहिती आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल कुलकर्णी यांनी दिली.
उपचारार्थ असणारे रूग्ण
पार्ले सेंटर – 32,
कृष्णा हॉस्पिटल – 90
सह्याद्री हॉस्पिटल – 14
श्री हॉस्पिटल – 6
एरम हॉस्पिटल – 16
इतर ठिकाणी 9 एकूण 167