नवी दिल्ली – केंद्र सरकारने सट्टेबाजी, जुगार आणि अनधिकृत कर्ज सेवेमध्ये गुंतलेल्या परदेशातील संस्थांद्वारे संचालित 232 ऍप्स ब्लॉक केले आहेत. त्यात काही चिनी ऍप्सचाही समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतर हे ऍप्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत.
जी ऍप्स बंद करण्यात आली आहेत त्यात बेटिंग, जुगार आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये गुंतलेली 138 ऍप्स आहेत. अनधिकृत कर्ज सेवेत गुंतलेली 94 ऍप्स आहेत.ही ऍप्स ऑफशोअर संस्थांकडून म्हणजेच विदेशातून ऑपरेट केली जात होती. त्यामुळे ते देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करत होते,असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. ब्लॉक करण्यात आलेल्या ऍप्सची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.