Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यानंतर आता येत्या 13 मे 2024 रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानुसार आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफ थंडावणार आहेत. यानिमित्त महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवार आपली सर्व ताकद पणाला लावून प्रचार करणार आहेत. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, जालना, औरंगाबाद, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड मतदारसंघांचे मतदान होणार आहे. Lok Sabha Election 2024|
आज शेवटच्या दिवशी राज्यात दिग्गज राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू असणार आहे. यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नितीन गडकरी, प्रियंका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांचा समावेश आहे.
कोणत्या नेत्यांची कुठे होणार सभा? Lok Sabha Election 2024|
– काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा घेणार.
– मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे.
– अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार, आदित्य ठाकरे यांची हडपसर येथे जाहीर सभा होणार आहे.
– भारती कामडी यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पालघर येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
– राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे पुण्यातील कोथरूड येथे सकाळी ११ वाजता रॅली काढणार आहे.
– संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा छत्रपती संभाजीनगर शहरात रॅली काढणार आहे.
– महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे बीडच्या परळी येथे दुपारी १२ वाजता जाहीर सभा घेणार आहेत.
– मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी १०.३० वाजता पुण्यात सभा घेतील.
– नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत सभा घेणार आहेत.
– छत्रपती संभाजीनगर येथे खासदार नवनीत राणा दुपारी २ वाजता महिला मेळावा घेणार आहेत.
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुपारी ३.३० वाजता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे सभा घेणार आहेत.
दरम्यान, चौथ्या टप्प्यात एकूण 11 मतदार संघात मतदान होईल. तर देशाच्या 10 राज्यातील 96 मतदार संघात मतदान होणार आहे. त्यासाठीचा आज सायंकाळी 6 वाजता प्रचार आज थंडावणार आहे. या टप्प्यात राज्यातील रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, हिना गावीत, रक्षा खडसे हे दिग्गज मैदानात आहेत. 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी होणार मतदान होणार आहेत. तर अंतिम निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.
हेही वाचा:
एका क्लिकवर पहा तुम्हाला आलेली आयकर नोटिस ; पोर्टलवर आली ‘ही’ सुविधा