रेल्वे पोलिसांच्या युनिफॉर्मलाही कॅमेरा

स्थानक परिसरातील छोट्या मोठ्या हालचालींवर असणार नजर

पुणे – रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्मवर आता छुपे कॅमेरे (बॉडी वॉर्न कॅमेरे) लावण्यात येणार आहेत. या कॅमेरांमुळे आता पोलिसांना पुणे स्थानकावरील छोट्या मोठ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येणार असल्याचे पुणे रेल्वे पोलीस दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त बी. के. मकरारीया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे स्थानक परिसरामध्ये तैनात असणारे रेल्वे पोलीस कर्मचारी स्थानकासह प्लॅटफॉर्म आणि रेल्वे गाड्यांमध्ये बंदोबस्त ठेवतात. या ठिकाणी होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरांचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वे पोलिसांना 25 कॅमेरे उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक कॅमेरामध्ये आठ तासांचे रेकॉर्डिंग होणार असून कर्मचाऱ्यांची ड्युटी संपल्यानंतर संबंधित कर्मचारी कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग मॉनेटरिंग रुममध्ये सेव्ह केले जाते. 25 कॅमेऱ्यांचे 30 दिवसांचे रेकॉर्डिंग सेव्ह केले जाणार आहे.

अनेकदा स्थानकावर आणि रेल्वे डब्यामध्ये प्रवाशांचे सामान चोरीला जाणे, वादविवाद होणे, छेडछाडीच्या घटना घडतात. तसेच स्टेशन परिसरात संशयी पद्धतीने फिरणे, एखादी बेवारस वस्तू ठेवणे असे प्रकार होतात. या प्रकारांवर बारिक नजर ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांचा उपयोग होणार असल्याचे मकरारिया यांनी नमूद केले.

महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
रेल्वे स्थानक परिसर आणि गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे पोलीस अधिकाधिक प्रयत्न करित आहेत. पोलिसांच्या “तेजस’ पथकासह महिला कर्मचारी देखील असतात. त्याचबरोबर महिलांना तक्रार करताना भीती आणि संकोच वाटू नये यासाठी 182 क्रमांकाच्या हेल्पलाईनसह हेल्पलाइन बुथवर देखील महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे मकरारिया म्हणाले.

शब्बीर शेख यांची गुप्तवार्ता विभागात नियुक्ती
पुणे रेल्वे पोलीस दलातील गुप्तवार्ता विभागाच्या निरीक्षक पदाचा पदभार गुरुवारी शब्बीर शेख यांनी स्वीकारला. त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी लोकेश सागर तर, प्रवासी सुरक्षा विभागाच्या निरीक्षकपदाची सुत्रे संदीप पवार यांनी स्वीकारली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.