“ब्रेकडाऊन’चे भूत मानगुटीवरच!

एकट्या मे मध्ये पीएमपीच्या तब्बल दोन हजारांवर बसेस रस्त्यातच बंद
ब्रेकडाऊनची कारणे
-बसेसचे क्‍लच,
-एअर लॉक, स्टार्टर फेल होणे
-बॅटरी डाऊन होणे
-इंजिन गरम होणे

पुणे  – शहराची मुख्य सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पीएमपीच्या “ब्रेकडाऊन’चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मेमध्ये पीएमपीच्या मालकीच्या 2 हजार 126 बसेस, तर कंत्राटी 2 हजार 794 बसेसचे ब्रेकडाऊन झाले आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्ये पीएमपीच्या मालकीच्या दोन हजार 621 बसेस तर कंत्राटी मालकीच्या दोन हजार 742 बसेसचे ब्रेकडाऊन झाले होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणाऱ्या पीएमपीच्या सरासरी 70 ते 75 बसेस दिवसाला बंद पडतात. ब्रेकडाउन कमी करण्यात प्रशासनाला अद्यापपर्यंत यश न आल्यामुळे प्रवाशांनाही मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण काही अंशी कमी झाले असले तरी समाधानकारक नाही. या बसेस भर रस्त्यात बंद पडल्याने वाहनांच्या लांब रांगा लागतात. पर्यायाने वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे वाहतूक विभागाने बस बंद पडल्यास दंड आकारण्याची तंबी दिली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात 551 सीएनजी, 811 डीझेल बसेस आहेत. तर कंत्राटी मालकीच्या 577 सीएनजी आणि 25 ई-बस आहेत. वारंवार होणाऱ्या “ब्रेकडाऊन’बाबत पीएमपीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या “ब्रेकडाऊन’वर उपाययोजना करुन हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून
सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.