दुभाजकांतील ऍन्टी ग्लेअरची मोडतोड

ढेबेवाडी-कराड महामार्गावर समाजकंटकांकडून कृत्य 

ढेबेवाडी – ढेबेवाडी-कराड मार्गाचे चौपदरीकरण झालेल्या रस्त्याच्या दुभाजकाचे काही समाजकंटकांकडून आतोनात नुकसान सुरु आहे. रात्रीच्या सुमारास ये-जा करताना वाहनचालकांना समोरुन येणाऱ्या वाहनांच्या लाईटचा त्रास होवू नये. म्हणून बसविलेले ऍन्टी ग्लेअर अनेक ठिकाणी मोठमोठे दगड टाकून तोडण्यात आले आहेत.

ढेबेवाडी-कराड या सुमारे 27 किलो मीटर रस्त्याच्या मानेगांव पर्यत चौपदीकरण पूर्ण झाले असून तेथून पुढे ढेबेवाडी पर्यत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. आता पूर्वीपेक्षा रस्ता मोठा झाल्याने वाहतुकीत सुसूत्रता आली असली तरी रस्त्यावर तयार केलेल्या दुभाजकाचे उपद्रवीकडून सुरु असलेले नुकसान वाहनचालक व प्रवाशासह नागरिकांना त्रासाचे बनले आहे. सदरच्या दुभाजकावर सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या झाडांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुरुममिश्रीत मातीत लावलेली अनेक फुलझाडे गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेली वाळून गेलेली आहेत. रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या बाजूने समोरुन येणाऱ्या वाहनांचा लाईटमुळे वाहनचालकांचा गोंधळ उडून अपघाताला निमंत्रण मिळू नये, यासाठी दुभाजकात सिमेंट कॉक्रिटमध्ये ऍन्टी ग्लेअर बसविण्यात आली. त्यासाठी लाखो रूपये खर्च झाले आहेत.
या मार्गावर विशिष्ट आकारातील ऍन्टी ग्लेअरमुळे रस्त्याचे सौदर्य खुलले असताना उपद्रवींनी विनाकारण त्याची मोडतोड केल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मोठे दगड आणि लाथा मारून त्याची मोडतोड करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी कॉक्रिटमधून उपटून काढून टाकण्यात आले आहेत.

मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी या मार्गावर अनेक ठिकाणच्या गावातील लोक बिनधास्त रस्त्यावर वावरत असतात. त्यामुळे अपघाताला नियंत्रण देणारे ठरत आहेत. याला आळा बसणे गरजेचे आहे. कारण रस्त्याच्या दुभाजकात वाढलेल्या गवतात गुरे चारत अनेकजण बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अनेक वेळा अडथळा होत असून अनेक अपघातही झाल्याचे प्रकार घडले आहेत.

ढेबेवाडी-कराड मार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरण करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यात आली. बांधकाम विभागाने झाडे तोडल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करुन नव्याने झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची मागणी केली असली तरी याबाबत कार्यवाही झालेली दिसत नाही. या मार्गावरील रस्त्याच्या दुभाजकावर बसविण्यात आलेले ऍन्टी ग्लेअर ची मोडतोड करून मोठे नुकसान करण्यात आले.

सचिन यादव, सामाजिक कार्यकर्ता, साईगडे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.