मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत आहे. एनसीबीकडून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा शाहरुखला मोठा फटका बसल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत. एका मोठ्या ब्रॅन्डने शाहरूखसोबतचा कॉन्ट्रॅक्ट तोडला असून काही दिवसांपासून त्याच्या जाहिरीतीचे ऍडव्हान्स पेमेंट देऊनही जाहिरती बंद करण्याची घोषणा केली आहे. हा प्रोजेक्ट शाहरुखच्या मोठ्या प्रोजेक्टपैकी आहे.
एका प्रख्यात इंग्रजी माध्यमाच्या रिपोर्टनुसार, यावर काही जाणकारांनी सांगितले आहे की, एडटेक स्टार्टअप बायजूने या प्रकरणानंतर शाहरुखच्या जाहिराती परत घेतल्या. याबाबत बायजूच्या प्रवक्त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, बायजूसोबत शाहरूखची तीन ते चार कोटी रुपयांची वार्षिक डील ठरलेली होती. तो या कंपनीचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर आहे. शाहरुखमुळे या कंपनीची जास्त प्रसिद्धी झाली. मात्र सध्या शाहरुखशी संबंधित सगळं प्रमोशन थांबवलं आहे. कारण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला ड्रग्स प्रकरण सुरू असताना त्याच्यासोबत प्रमोशन करायचे नाही. पण शाहरुखला ब्रॅन्ड ऍम्बेसेडर म्हणून काढून टाकण्यात आले की नाही हे अजून स्पष्ट नाही.
दरम्यान, शाहरुख खान बायजूसह हुंदाई, एलजी दुबई टुरिझन, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स जियो यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर आहे. आर्यन खानच्या प्रकरणाचा शाहरूखला सर्वच बाजूंनी मोठा झटका बसला आहे.