लातूर – वडिल सतत दारू पिऊन आईला मारहाण करतात याचा राग मनात धरून दोघा भावांनी वडिलांचा खून केला. ही घटना औसा तालुक्यातील शिंदाळावाडी येथे घडली. याप्रकरणी कृष्णा मच्छिंद्र गरड व त्याच्या भावावर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मच्छिंद्र काशीनाथ गरड (वय 43) यांचा मृतदेह शिंदाळवाडी शिवारातील योगिता गरड यांच्या शेतात आढळला. काही वेळातच सपूर्ण गावात चर्चा सुरू झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर बेलकुंड येथील प्राथमिक
आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयताच्या मानेवर, डोळ्यावर जखम झाल्याचे दिसून आले.
सदर माहितीनूसार गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी मयताचे वडील काशिनाथ गरड यांच्या फिर्यादीवरून कृष्णा गरड आणि त्याच्या भावावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक करत आहेत.