हडपसर – प्रतिथयश शेतकरी आणि प्रसिद्ध आडते नरसिंग तुकाराम उर्फ नाना तुपे यांनी लिहलेले ‘मी आणि माझे मार्केट’ या पुस्तकातून पुण्यातील महात्मा फुले मंडई तसेच छत्रपती शिवाजी मार्केटचा इतिहास उलगडत आहे. आजच्या पिढीला ते दिशादर्शक ठरेल. नानांचे हे पुस्तक म्हणजे पुण्याचा सांस्कृतिक ठेवाच आहे. असे गौरवोद्गार ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी काढले.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे नरसिंगनाना तुपे यांच्या ‘ मी आणि माझे मार्केट’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नरसिंगनाना तुपे, माई तुपे, तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार अशोकराव मोहोळ, आमदार चेतन तुपे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अंकुश काकडे, राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, उल्हास पवार, मगरपट्टा सिटीचे प्रवर्तक सतिश मगर, उद्योजक रोहिदास मोरे, कैलास कोद्रे, मुक्ता प्रकाशनच्या विजया पाटील, प्रशासक मधुकांत गरड, अडते अध्यक्ष अनिरुद्ध भोसले, संतोष नांगरे, विलास भुजबळ, गणेश घुले आदीजण उपस्थित होते.
कोल्हापूर येथील मुक्ता प्रकाशने हे पुस्तक प्रकाशित केले असून प्रसाद धारे यांनी शब्दांकन केले आहे. पुस्तक प्रकाशन दरम्यान उदय साटम निर्मित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. नाना तुपे आणि त्यांच्या पत्नी माई तुपे यांचा सत्कार ही यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
दत्तात्रय तुपे, बाबासाहेब तुपे, प्रमोद आबा तुपे, प्रवीण तुपे, विकास तुपे, शैलेश कांडगे, संदीप तुपे, राहुलआबा तुपे, अभिजीत मोरे, प्रशांत तुपे, अविनाश काटे, गजेंद्र वारघडे, अमर तुपे, भूषण बडदे, रंजीत मोरे, मनीष तुपे, नरेश तुपे, नंदकुमार घुले, आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व आडते- मापाडी, हमाल संघटना यांनी या प्रकाशन सोहळ्याचे संयोजन केले होते. प्रास्ताविक प्रमोद तुपे यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर नीता मोरे यांनी आभार मानले.