आढळराव निवडून न येणे ही मोठी खंत – नीलम गोऱ्हे

राजगुरूनगर – लोकसभा निवडणुकीत दिल्लीत सरकार आले. राज्यातही अनेक खासदार निवडून आले. मात्र, शिरूर लोकसभेत अपयश आहे. हे अपयश “गड आलापण सिंह गेला’ अशी भावना मनामध्ये निर्माण करून गेले आहे. तीनवेळा निवडणून आलेले खासदार आढळराव पाटील यावेळी निवडून आले नाही ही मोठी खंत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजगुरुनगर व्यक्‍त केली.

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे या नाशिकवरून पुण्याकडे येत असताना सोमवारी (दि. 22) सायंकाळी खेड तालुका शिवानेनेच्या त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना शाखेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज, बस स्थानकातील हुतात्मा राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी आमदार सुरेश गोरे, जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, तहसीलदार सुचित्रा आमले, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, अशोक खांडेभराड, पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे, उर्मिला सांडभोर, नंदा कड, सारिका घुमटकर, दिलीप तापकीर, कैलास गोपाळे, एल. बी. तनपुरे, बाळासाहेब शिंदे, बाबा हजारे, बाबा इनामदार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आयसीआयसीआय सारख्या मोठ्या कंपनीने शेतकऱ्यांकडून पिक विम्याच्या नावाखाली पैसे घेतले आणि पिक विमा रक्‍कम दिली नाही. शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट असतानाही या कंपन्यांनी हात वर केले. मात्र, या प्रश्‍नासाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने लढा सुरू आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी पीक विम्याचा प्रश्‍न हाती घेतल्याने शेतकऱ्यांना मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक विजया शिंदे यांनी केले सूत्रसंचालन सुदाम कराळ, तर महिला शहर प्रमुख उर्मिला सांडभोर यांनी आभार मानले.

डॉ. नीलम गो-हे यांनी श्री सिद्धेश्वराचे दर्शन व अभिषेक करून पुढे जातात या कार्यक्रमानंतर येथील मंदिरात अभिषेक करून पूजा केली.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कर्तृत्व, व्यक्तिमत्व सर्वांना माहिती आहे. राज्यातील महिलांचा त्या आधारस्तंभ आहेत. महिलांचे त्या गेली अनेक वर्षांपासून प्रतिनिधींत्व करीत आहेत. तालुक्‍यात शिवसैनिक चांगले काम करीत असल्याने नागरिकांची कामे होत आहेत. तालुक्‍यात शिवसेना पक्ष प्रबळ झाला आहे.
– सुरेश गोरे, आमदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)