पुणे – तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. संदीपान अभिमान माळी (56) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या पत्नीने एकाविरूद्ध सावकारी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दाखल गुन्ह्यातील चार्जशिट बाजूने पाठविण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीपान माळी यांनी 40 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये स्वीकारताना माळी यांना रंगेहात पकडण्यात आले.