शिलॉंग : आसाम रायफल्सच्या पथकाने शुक्रवारी आठ कोटी 58 लाख रुपयांचे अंमली पदार्थ पकडले. भारत – म्यानमार सीमेवर ही कारवाई करण्यात आली.
भारत म्यानमार सीमेवरील चवांगपाई चौकीजवळ आसाम रायफल्सच्या जवानांनी चार किलो 290 ग्रॅम ब्राऊन शुगर हस्तगत केली. सायंकाळी तपासणींच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. या भागातून जवानांनी एक स्कूटरही जप्त केली आहे.
आसाम रायफल्सच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम रायफल्सच्या कर्मचाऱ्यांना एका स्कूटरवर एक संशयास्पद व्यक्ती येताना दिसली. ही व्यक्ती म्यानमारमधून मणीपूरच्या दिशेने येत होती.
या व्यक्तीला कर्मचाऱ्यांनी थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी त्याने आपली स्कूटर आणि तीन पिशव्या सोडून तेथून पोबारा केला.
आसाम रायफल्सच्या पथकाने हा माल जप्त करून मोरेह पोलिस ठाण्यात जमा केला. तपास पोलिस करत आहेत.