पुणे: भिम छावा संघटनेच्या वतीने पुणे महानगरपालिका येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी धुणीभांडी धुलाई आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहराचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी व्ही. कुलकर्णी यांनी प्रवेशद्वारावर येऊन निवेदन स्विकारले आणि दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल,असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते.