ग्रेनाडा: सलामीवीर पाॅल स्टर्लिंगच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्टइंडिजचा ४ धावांनी पराभव केला केला. या विजयासह आयर्लंडने तीन टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आयर्लंडचा पाॅल स्टर्लिंग सामन्याचा मानकरी ठरला.
💥 95 runs
💥 47 balls
💥 6 fours, 8 sixesPaul Stirling's 🔥 knock helped Ireland seal a thrilling four-run win over West Indies in the first T20I.
Report 👇https://t.co/AISbvJjLYb
— ICC (@ICC) January 16, 2020
आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद २०८ धावसंख्येपर्यत मजल मारली होती. आयर्लंडकडून फलंदाजीत सलामीवीर पाॅल स्टर्लिंगने ४७ चेंडूत ६ चौकार व ८ षटकारांसह ९५ धावांची तर केविन ओ ब्रायनने ३२ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ४८ धावांची खेळी केली. गैरेथ डेलानीने १९ आणि गैरी विल्सनने १७ धावांच योगदान दिलं. वेस्टइंडिजकडून शेल्डन काॅटरेल, ख्यारी पिएरे, ड्वेन ब्रावोने प्रत्येकी २ आणि हेडन वाल्शने १ गडी बाद केला.
#WIvIRE Big total but bigger hearts in the dressing room! 2nd innings here WI come! #MenInMaroon🌴 #ItsOurGame pic.twitter.com/yUVuSeJF98
— Windies Cricket (@windiescricket) January 15, 2020
प्रत्युत्तरात वेस्टइंडिजला आयर्लंडने २० षटकांत ७ बाद २०४ धावसंख्येवरच रोखलं आणि केवळ ४ धावांनी विंडीजला पराभवाला सामोरं जावं लागलं. वेस्टइंडिजकडून लेंडल सिमंसने २२(१४), एविन लुइसने ५३(२९), शिमरन हेटमायरने २८(१८), कायरन पोलार्डने ३१(१५), निकोलस पूरनने २६(२३) आणि शरफेनं रदरफोर्डने २६(१३) धावांची खेळी केली.
#WIvIRE Down to the wire!😫 Tough loss boys, WI will be back! #MenInMaroon🌴 #ItsOurGame pic.twitter.com/NU6MN8s1Ay
— Windies Cricket (@windiescricket) January 15, 2020
शेवटच्या षटकांत वेस्टइंडिजला १५ धावांची आवश्यकता होती, मात्र आयर्लंडचा गोलंदाज जोशुआ लिटील याने शेवटच्या षटकांत पहिल्या व पाचव्या चेंडूवर विकेट घेत ११ धावा दिल्यानं विंडीजचा पराभव झाला. आयर्लंडकडून जोशुआ लिटीलने ४ षटकांत २९ धावा देत सर्वाधिक ३ तर क्रेग यंगने ४ षटकांत ३१ धावा देत २ गडी बाद केले. सिमी सिंह आणि जाॅर्ज डाॅकरेलने प्रत्येकी १ गडी बाद केला.