Thackeray Group | Kailas Patil | Lok Sabha Election 2024 : एकीकडे उमेदवारी निश्चितीवरून इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगल्याने राजकीय वातावरण तापले असताना, उन्हाच्या तीव्र झळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ‘रण’ अधिकच तापवणाऱ्या ठरत आहेत.
मार्चअखेर कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता काय असेल, या विचारानेच उमेदवार, तसेच कार्यकर्त्यांना धडकी भरली आहे. असं असलं तरी अनेकांना या उन्हामध्ये काम करावं लागतंय.
सध्या भर उन्हात उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पण उष्णतेच्या लाटेचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसू लागला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना धाराशिवमध्ये प्रचारसभेत चक्कर आली.
त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. । Thackeray Group | Kailas Patil | Lok Sabha Election 2024
कैलास पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार कैलास पाटील यांना उष्माघातामुळे हा त्रास झालाय. सभा सुरु असताना त्यांना अचानक चक्कर आली आहे. आणि ते चक्कर येऊन जमिनीवर पडले.
घटनेचं गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेलं. कैलास पाटील यांना रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. । Thackeray Group | Kailas Patil | Lok Sabha Election 2024