नवी दिल्ली – ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादन 3.2 टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान औद्योगिक उत्पादन वीस टक्क्यांनी वाढले आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत औद्योगिक उत्पादन 17.3 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 4.5 टक्क्यांनी वाढले होते त्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन कमी प्रमाणात वाढले असले तरी औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सकारात्मक पातळीवर असल्याबद्दल केंद्रीय उद्योग मंत्रालयाने समाधान व्यक्त केले आहे.
या वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ होत असून आगामी काळातही ही वाढ कायम राहिल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी भावना उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.