विधानसभेच्या निवडणुकीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; बडे नेते निशाण्यावर

गुप्तचर खात्याकडून अलर्ट

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिन आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवर दहशतवादी हल्ल्‌याचे सावट निर्माण झाले आहे. राजकीय पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारकांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता गुप्तचर खात्याने वर्तविली आहे. यामुळे दिल्ली पोलिसांची झोप उडाली आहे.

गुप्तचर खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बडे नेते आणि स्टार प्रचारकांवर हल्ला होवू शकतो. प्रजासत्ताक दिनामुळे दिल्लीत आधीच हाई अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशात, राजकीय नेत्यांवर हल्ला होण्याचे संकेत मिळाल्यामुळे दिल्ली पोलिसांची झोप उडाली आहे.

दहशतवादी हल्ला करण्यासाठी यावेळी नवीन पध्दतीचा वापर करू शकतात. अशात, निवडणुकीच्या प्रचार सभांच्या सुरक्षेकडे जराही दुर्लक्ष केले जावू नये, असे गुप्तचर खात्याने पोलिसांना कळविले आहे. महत्वाचे म्हणजे प्रचार सभांमध्ये कमी आढळून आल्यास सभा ऐनवेळी रद्द केली जावू शकते. रोड शो दरम्यानही हल्ला होवू शकतो.
आतापर्यंत दिल्लीत विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या आहेत. परंतु, एकाही निवडणुकीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली नव्हती. ही पहिली निवडणूक असेल ज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील आयएस मॉडेलचा दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्याने गुप्त माहिती दिल्यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. बांग्लादेशी नागरिकांच्या आडून दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here