निर्भयाच्या दोषींसाठी 1 फेब्रुवारीचे “डेथ वॉरंट’

नवी दिल्ली – निर्भयाच्या दोषींसाठी दिल्लीतील न्ययालयाने आज 1 फेब्रुवारी वाजताचे सुधारित “डेथ वॉरंट’ बजावले आहे. या प्रकरणातील चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवले जाणार, हे आता निश्‍चित झाले आहे. दिल्ली न्यायालयातील अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश सतिश कुमार अरोरा यांनी हे “डेथ वॉरंट’ बजावले आहे.

या दोषींपैकी मुकेश कुमार सिंह याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. फाशीसाठी 22 जानेवारीच्या नियोजनाला पुढे ढकलण्यासाठी मुकेश याने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीपूर्वी तिहार तुरुंग प्रशसानाने या चारही दोषींच्या फाशीच्या अंमलबजावणीसाठी नव्याने “डेथ वॉरंत’ बजावण्याची मागणीही न्यायालयामध्ये केली होती.

मुकेश याने दाखल केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून फेटाळला गेला असल्याचे सरकारी वकिल इरफान अहमद यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर या चारही दोषींसाठी नव्याने “डेथ वॉरंट’ बजावण्यात आले.
23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनी “निर्भया’वर 16 आणि 17 डिसेंबर 2012 दरम्यानच्या रात्री दक्षिण दिल्लीत सहा नराधमांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला गेला होता. त्यानंतर या तरुणीला रस्त्यावर फेकून दिले गेले होते. 29 डिसेंबर 2012 रोजी सिंगापूरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here