कराड -कराड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सातारा जिल्ह्याची आठशेकडे तर कराड शहराची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भिती वाढतच चालली आहे. ही आकडेवारी कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. त्याला नागरिकांनीही प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार कराड तालुक्यात एकूण 73 बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये तालुक्यातील एकूण 50 तर शहरातील 23 बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळीही काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे आणखीनच वाढ होण्याची शक्यता दाट आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे.
याचा बाधितांच्या संख्येवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने सोशल मिडीयामधून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान करोनाने शहरातील मध्यवस्तीतही प्रवेश केला आहे. अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहे. वाढत्या बाधितांची संख्या ही प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.
बुधवार रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार कराड शहरातील बुधवार पेठ येथील 20 व 44 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय डॉक्टर व 25, 30, 33, 30, 32, 33, 26, 48, 52, 28 वर्षीय पुरुष व 32, 43, 42, 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 28, 58 वर्षीय महिला 16 वर्षीय तरुणी व 25 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला बाधित असल्याचे आढळून आले.
तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5 व 7 वर्षीय बालक, 60 व 38 वर्षीय पुरुष, 42, 48, 32, 27 वर्षीय महिला, 5 व 2 वर्षीय बालिका, घराळवाडी-येवती येथील 66 वर्षीय महिला, रेठरे बु. 35 वर्षीय महिला, गोवारे येथील 6 व 14 वर्षीय बालक, विद्यानगर येथील 60 वर्षीय पुरुष, शिंदे हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेले 47 व 46 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष, 26 व 27 वर्षीय महिला, टेंभू येथील 65 वर्षीय पुरुष,
कामथी येथील 67 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 45 व 42 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालक, इंदोली येथील 30 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल येथील खुबी येथील 52 वर्षीय पुरुष, सदाशिवगड येथील 31 वर्षीय महिला, पाडळी येथील 50 वर्षीय पुरुष, म्होप्रे येथील 23 वर्षीय महिला, बनवडी कॉलनी येथील 40 वर्षीय महिला,
गोळेश्वर येथील 44 व 62 वर्षीय पुरुष, 54 व 24 वर्षीय महिला, सावडे येथील 52 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 35 वर्षीय महिला, 14 व 7 वर्षीय बालके, कोर्टी येथील 40 वर्षीय महिला, मलकापूर येथील 23 व 49 वर्षीय महिला व 33, 55, 42 वर्षीय पुरुष यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. बाधितांच्या वाढत असलेल्या संख्येमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
मलकापूर 118 तर कराड मध्ये 93 बाधित
कराड तालुक्यातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवालात तालुक्यात एकूण 73 पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. वाढत असलेली रूग्णांची संख्या चिंताजनक बनत चालली आहे.
तालुक्यात सर्वाधिक रूग्णसंख्या असणाऱ्या गावांमध्ये मलकापूर व कराड शहराचा समावेश आहे. मलकापूर मधील बुधवार अखेर बाधितांची संख्या 118 इतकी होती. तर कराड शहरातील बाधितांची संख्या 93 इतकी झाली आहे. त्यामुळे दोन्ही गावातील प्रशासनापुढे करोनामुक्तीचे आव्हान उभे राहिले आहे.
क्वारंटाइनसाठी मुख्याधिकारी स्वत: हजर
कराड शहरातील मध्य वस्तीमध्येही करोना बाधित रूग्ण आढळत आहेत. पालिकेत नुकतेच रूजू झालेले मुख्याधिकारी रमाकांत डाके हे करोना संदर्भातील प्रत्येक प्रक्रियेमध्ये जातीने लक्ष दिले आहेत. बुधवारी स्मशानभूमीमध्ये त्यांनी हजेरी लावली होती. तर गुरूवारी कसाबवाडा येथील लोकांना क्वारंटाइन करण्यासाठीही ते हजर होते.